मुंबई : आगामी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित असले तरी सर्वाधिक चर्चा अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली ठाकरे यांच्या उपस्थितीची झाली.
मिताली ठाकरे बैठकीला उपस्थित राहिल्याने त्या देखील राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांच्या उपस्थितीवरून युवासेना नेत्याने थेट राज ठाकरेंच्या कुटुंबावरच निशाणा साधला आहे.
'शॅडो' चे पण 'माझे कुटुंब – माझी जबाबदारी' https://t.co/yiRXFxnbcS
— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 29, 2021
मनसेकडून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची नेमणूक करण्यात आली होती. हाच धागा पकडत युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ असं म्हणत थेट राज ठाकरेंच्या कुटुंबाला टोला लगावला.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या नियोजनासाठी मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे, विविध नेते उपस्थित आहेत.
Read Also :
- ‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा’, सचिन सावंताची चौकशीची मागणी
- ‘येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल’, मनसेचा शिवसेनेवर निशाणा
- ‘असा’ मिटणार धनंजय मुंडे आणि करूणा यांच्यातील वाद!
- ‘आता फार काळ विरोधी पक्षात राहायचे नाही’, फडणवीसांचे सूचक वक्तव्य
- भाजपच्या मनधरणीला अपयश, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण