पुणे : मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसे घेतलेली भूमिका राज्यात आता चांगलीच जोर धरू लागली आहे. उद्या पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. तर मनसेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. यातच आता पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्या कार्यक्रमाला मी जाणार असल्याचं वसंत मोरे यांनी आता स्पष्ट केलं आहे.
सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
वसंत मोरे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, उद्या राजसाहेबांच्या उपस्थित पुण्यात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. कुठेतरी अशी बातमी फिरत आहे की वसंत मोरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. हा खोडसाळपणा आहे. वसंत मोरे ठाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहु शकतो. दादरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. ज्याठिकाणी वसंत मोरे 100 टक्के उपस्थित राहणार. उगाच खोडसाळपणे चुकीच्या बातम्या पसरवून नयेत असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
पुण्यात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे . या उत्सवास राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार असून राज ठाकरे यांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे. तसेच सामूहिक महाआरती देखील होणार आहे.
राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
दरम्यान, उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या पुण्यातील खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून साखळीपीर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात राजकीय वातावरण ढवळून निघाण्याची शक्यता आहे.
Read also:
- लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
- “ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
- “मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
- मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार