मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खास करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली. बऱ्याच दिवसापासून गायब असलेल्या किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या मेव्हाण्याच्या कंपनीत 29 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा म्हटलं आहे.
मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
किरीट सोमय्या म्हणाले की, दादर येथील शिवाजी पार्कमध्ये जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कंपनी असून त्यात 29 कोटी रूपयांचा काळा पैसा पुरवण्यात आला आहे. तसेच श्रीजी होम्स कंपनी, वांद्रे येथील कंपनी, आणि शिवाजी पार्क येथे मोठी इमारत आहे. त्या श्रीजीच्या होम्समध्ये 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रूपये मनी लॉण्डिंग होऊन आले आहेत. दोन इंट्रा झाल्या त्यात पहिले 5 कोटी 80 लाख 86 हजार 902 आणि दुसरी 23 कोटी 75 लाख 48 हजार 418 ची झाली आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
“मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
या दोन्ही कंपनीत मनी लॉण्डिंग करण्यासाठी कोणत्या चतुर्वेदीची मदत घेतली. यांचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी सांगावं आणि या कंपनीशी तुमचा संबंध काय ?असा सवाल देखील त्यांनी केला आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या दीड डझन कंपन्यांची यादी आहे. त्यात दोन डझन आणखी कंपन्या बाहेर आल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या तीन कंपन्याचा व्यवहार झाला होता. त्याची माहिती मी दिली होती. 7 कोटीचं मनी लॉण्डिंग झालं. त्यावर ठाकरे कुटुंबाकडून एकही शब्द काढला नाही. असंही त्यांनी सांगितलं आहे.
फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार आहे. असा खळबळजनक आरोप त्यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. आज तुम्ही त्या आरोपीला प्रश्न विचारा. इलु इलु क्या है अंस आपण म्हणतो ना. तसं टॉयलेट घोटाळा काय आहे. असं त्या आरोपीला विचारा असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Read also:
- पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
- राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
- राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
- आरोपींकडून खंडणी, पीडितेचा गैरफायदा, त्यांची जुनी पद्धत; राष्ट्रवादीचा चित्रा वाघ यांच्यावर धक्कादायक आरोप
- तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर