मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खास करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली. बऱ्याच दिवसापासून गायब असलेल्या किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. तसेच उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
पत्रकार परिषदेत पत्रकारांशी सवांद साधताना ते म्हणाले की, मी काही व्यक्तिंसाठी नॉट रिचेबल असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. उद्या एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की उद्या ठाकरे सरकाराचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशाप्रकारचं नाटक करण्यात निपूण आहेत. संजय राऊत इडीच्या तिसऱ्या नोटीसनंतर चौकशीसाठी गेले होते. नोटीसला वॉरटं म्हणत नाही. संजय राऊत अडीच महिन्याचे चौकशीसाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी हिमंत असेल तर उत्तर द्यावं. एक डझन लोकांची संपत्ती घोटाळ्यात अटॅच झाली आहे. न्यायालयाने त्यावर स्टॅप लावला. जनतेचे पैसै लुटुन असे घोटाळे करणारं हे हिंदूस्थानमधील पहिलं राज्य सरकार आहे. असंही ते म्हणालेत.
हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
दरम्यान, अलिकडेच त्यांनी ठाकरे सरकारमधील डर्टी डझन भ्रष्टाचार नेत्यांची नावे जाहिर केली होती. ती यादी घेऊन ते दिल्लीत देखील दाखल झाले होते. त्यात अनिल देशमुख, अजित पवार, भावना गवळी. आनंद अडसुळ, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल परब सुजित पाटकर यांचा नावांचा समावेश होता.
Read also:
- फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं
- “या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
- स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
- “जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
- “पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका