अहमदनगर : गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार टिका केली होती. तसेच त्यांनी हिंदुत्व आणि मशिदीचा मुद्दा हातात घेतला. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा राजकीय नेत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा घेतली. याच पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज ठाकरे बोलण्यात हुशार आहेत. मात्र ती सभा आम्हाला राज ठाकरे यांची वाटली नाही. तर आम्हाला ती सभा भाजपची वाटली. आम्ही पूर्वीच्या राज ठाकरे यांच्या सभा ऐकल्यात आणि लोकांनीही ऐकल्यात. त्याच्यात फार मोठा बदल आम्हाला दिसला. ते जे खरे म्हणजेच खुरेखुरे राज ठाकरे झाकोळले गेलेले आहेत. असंही ते म्हणाले.
“मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
आता कुणाच्या तरी सांगण्याने विचार मांडणारे राज ठाकरे पुढे आलेले दिसत आहेत. खरे राज ठाकरे आम्ही पुर्वी पाहिले. हे सध्याचे राज हे राज ठाकरे नाहीत. असंही ते म्हणाले. आज संपुर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती साजरी केली जात आहे. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी संगमनेर येथेे पत्रकारांशी संवाद साधला.
“उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
दरम्यान, राज ठाकरे यांनी मागील दोन्हीही सभेत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांच्यावर जहरी टिका केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी खास करून राष्ट्रवादी काॅंग्रेसवर प्रहार करताना राष्ट्रवादीनंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता सगळीकडून टिकाटिप्पणी होत आहे.
Read also:
- भाजपच्या आमदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल! मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका
- “स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
- हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
- “कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
- सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना