ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाण्यातील उत्तर सभेत भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी तलवार बाहेर काढल्या प्रकरणी त्यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजिनक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्या कायद्यांर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
राज ठाकरे यांच्यावर ठाण्यातील तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर कार्यक्रमात तलवार हातात घेतल्याचं दाखवत आहे.
हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
संदीप देशपांडे यांनी त्या व्हिडीओच्या पाठीमागे उद्धवा अजब तुझे सरकार असं गाणं दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाणे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल. उत्तर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा नौपाडा पोलीस स्थानकात नोंद. मग ह्यांच काय ?असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या संदीप देशपांडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
दरम्यान, अलिकडेच महाविकास आघाडीतील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर अशाच प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर पुढे काय होणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
- “उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
- मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
- “ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
- आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त