ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उत्तर सभेत विरोधकांवर चांगली तोफ डागली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कडाडून टिका केली. मात्र या सभेत राज ठाकरे यांनी जाहीर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्य़ामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई होणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
राज ठाकरे यांचं ठाण्यातील सभेत भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी तलवार बाहेर काढल्या प्रकरणी त्यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजिनक ठिकाणी शस्त्र बाळगणे, दाखवणे, उगारणे यासंदर्भात कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्या कायद्यांर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
महाविकास आघाडीतील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांनी देखील अशाच प्रकारे एका भर कार्यक्रमात तलवारी दाखवली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालन्यात देखील छावा संघटनेनं राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. बेताल वक्तव्य करून फक्त स्वत: टीआरपी वाढवण्यासाठी जातीय दंगली घडवून आणत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
“राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिकेत बदल केला नाही. त्यांनी पुढील 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. नाहीतर त्या ठिकाणी मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवण्यात येईल असंही सांगितलं आहे.
Read also:
- “ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
- आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
- “मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
- हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
- ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ