ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष आणि महाविकास आघाडीतील नेते यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
पीडित तरूणीचे चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या झालेल्या मागच्या सभेत त्यांनी म्हटलं होतं की मदरशांमध्ये सध्या संशयास्पद घटना घडत आहेत आणि हे कुठं तरी थांबायला हवं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं होतं की मदरशांमध्ये काहीही सापडणार नाही. मदरशांमध्ये साधा वस्तरा देखील सापडणार नाही असं म्हणत राज ठाकरेंना डिवचलं होतं.
“शरद पवारांनी मोदींची भेट घेतली का ईडीची नोटीस पडते”; राज ठाकरे
यावर उत्तर सभेत राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. तो मुंब्र्यातला आव्हाड, तो आव्हाड हा एखाद्या सापासारखा फणा काढून बोलत असतो. काय तर म्हणे मदरशात दाढीचा वस्तरा तरी सापडेल का ? अरे आव्हाड मदरशात दाढीचा वस्तरा सापडुच शकत नाही, कारण ते दाढी करतंच नाही. मुंब्र्यातील गुन्हेगारांच्या बातम्यांबद्दलचा पाढाच राज ठाकरेंनी वाचून दाखवला. जितेंद्र आव्हाड यांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले की, आता आव्हाड बोलेल की साप डसेल म्हणून, तू ये बघ मी कसा गरगर फिरवून फेकून देतो की नाही ते बघचं एकदा असं म्हणून राज ठाकरेंनी आव्हाडांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.
माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
दरम्यान, संजय राऊत यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की ते लवंडे आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख ‘जंत’ पाटील असा केला. मोदी-पवारांचे संबंध सुमधूर असतात. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, असं म्हणत सर्वच राजकीय पक्षांवर चौफेर टीका केली.
Read also:
- “राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
- माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
- गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल
- सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
- पीडित मुलीने आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद वाटत आहे की..;