मुंबई : ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर कडाडून प्रहार केला. शरद पवारांच्या भाषणांत कधी छत्रपतींचा उल्लेख नसतो. तसेच ते नास्तिक आहेत. तर अजित पवारांच्या घरी ईडीची धाड पडते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. तर सुप्रिया सुळे यांचे खायाचे दात वेगळे अन् दाखवायाचे सुळे वेगळे अशी प्रखर टिका राज ठाकरे यांनी केली. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काव्यांच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा लिहिलं आहे. शाहु-फुले-आंबेडकर तिघेही महराजांच्या विचारावर चालतात. त्यासाठी मी त्यांचा भाषणात उल्लेख करतो. छत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे महत्वाचे वाटते. मी शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. हा त्यांचा खोटा आरोप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझा धर्म आणि देव यांचं मी प्रदर्शन करीत नाही. मी निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. मी एकाच मंदिरात जातो. माझं आदर्श हे प्रबोधनकार ठाकरे आहेत. आम्ही त्यांचं लिखाण वाचतो. त्यामुळे त्यांच्यावर अधिक बोलायची गरज वाटत नाही. असंही ते म्हणालेत.
“राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
मी शिवाजी महाराजांबाबत काय बोललोय? हे ऐकावं . ते वृत्तपत्रात वाचावं, पंरतु त्यासाठी सकाळी लवकर झोपेतून उठावं लागतं. एखादी व्यक्ती सहा महिन्यानंतर मत व्यक्त करते. ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. मी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. असा उल्लेख त्यांनी केला. दोन दिवसांपुर्वी मी अमरावतीला होतो. तुमचे कोणी सहकारी असतील तर त्यांच्याकडून माझं शिवाजी महाराजांच्या योगदानावर केललं भाषण मागवून घ्या. मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचायची सवय आहे. असंही ते म्हणाले.
माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीसह राज्यातील इतर नेत्यांवर जोरदार टिका केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील तर जितेंद्र आव्हाड यांना सापाची उपमा दिली. त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अगदी शेलक्या शब्दात टीका केली. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
Read also:
- आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
- “मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
- हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
- ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ