मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांमागे इडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नावावर असलेले दोन फ्लॅट ज्यांची किंमत तब्ब्ल ११ कोटी रुपये इतकी आहे, ते दोन्ही फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.
“राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली
नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग, २००२ च्या तरतुदींनुदीं नुसार ईडीने ने २०१३ च्या FIR क्रमांक २१६च्या आधारे ३० सप्टेंबर २०१३ रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी NSEL प्रकरणात, त्याचे संचालक आणि NSEL चे प्रमुख अधिकारी, NSEL चे २५ डिफॉल्टर आणि इतरही मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
या प्रकरणात आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी एक प्लॅन तयार केला होता. गुंतवणूदारांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, बोगस वेअरहाऊसपावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, खाती खोटी केली आणि त्याद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग असे विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. या प्रकरणात १३ हजार गुंतवणूकदारांनी ५६०० कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली होती. पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले की, विविध गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे हे थकीत कर्ज फेडण्यासाठी आणि इतर काही गोष्टींसाठी थेट वळविण्यात आले होते.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल
दरम्यान, सदरील प्रकरणामध्ये ज्या कंपन्यांच्या व्यवहारांत अनियमितता आढळून आली होती, त्या दोन्ही कंपन्या म्हणजेच मेसर्स विहंग एंटरप्रायझेस आणि मेसर्स विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळेच ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता आगामी काळातील ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या प्रकरणामुळे शिवसेनेची मते कमी होण्याची शक्यता आहे.
Read also:
- “मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
- हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
- ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
- “मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल