मुंबई : ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर कडाडून प्रहार केला. शरद पवारांच्या भाषणांत कधी छत्रपतींचा उल्लेख नसतो. तसेच ते नास्तिक आहेत. तर अजित पवारांच्या घरी ईडीची धाड पडते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. तर सुप्रिया सुळे यांचे खायाचे दात वेगळे अन् दाखवायाचे सुळे वेगळे अशी प्रखर टिका राज ठाकरे यांनी केली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
माझा नेता कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हता; सलिम मामा शेख यांचा ठाण्यातून एल्गार
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज ठाकरे यांच्या भाषणाला मी फारसं महत्व देत नाहीत आणि ते मी पाहिलं पण नाही. सगळी वर्तमान पत्रातील काही मुद्दे वाचले. तर त्यात फक्त थोडं मनोरंजन आणि एखाद्या मालिकेत, चित्रपटात ज्या पद्धतीचं आशाय असतो. त्या पद्धतीचा थोडा मसाला त्यांनी टाकला आहे. थोडा मसाला तो हक है उनका, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणांला फारसं महत्व दिलं नाही.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेचे तारे तोडले; राज ठाकरेंचा हल्लाबोल
देशात, राज्यात महागाई, उद्योग व्यवसाय पर्यटन असे इतरही मुद्दे आहेत. त्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. राज ठाकरे यांनी हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं . त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली. ज्या लोकांना इतिहासात रमायला आवडतं. त्यांनी इतिहास जरूर वाचावा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; पुत्र नीलचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीसह राज्यातील इतर नेत्यांवर जोरदार टिका केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील तर जितेंद्र आव्हाड यांना सापाची उपमा दिली. त्याचबरोबर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अगदी शेलक्या शब्दात टीका केली. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
Read also:
- हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
- ” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
- ..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
- “मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
- “राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील”; ठाण्याच्या सभेत वसंत मोरेंची तोप धडाडली