पुणे : ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर कडाडून टिका केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं. शरद पवार यांनी देखील आता राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आता त्यांच्यावर टिका केली आहे.
” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा”; आव्हाडांचं राज ठाकरेंना तिखट उत्तर
महाराष्ट्राचे बहुरूपी नेते राज ठाकरे हे संघाच्या पुर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत. हे भाषणावरून समजते. उद्या बहुरूपी राज ठाकरे यांनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चार्य वाटणार नाही. 307 कलम, काश्मिरी पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे राष्ट्रीय संघाचे मुद्दे आहेत. जे राज ठाकरे भाषणांमधून मांडताहेत. असंही ते म्हणालेत.
..तर हिंदू जागा झाल्यास सरकारचं अवघड होईल ; नितेश राणेंनी सरकारवर डागली तोफ
शरद पवार हे जातीयवादी नेते, देव, धर्म मानत नाहीत. एका धर्माचे लांगूलचान करीत आहेत. हा प्रचार संघ गेली अनेक दशके शरद पवार यांच्या विरोधात करत आहे. आज फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून मांडत आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांची स्क्रिप्ट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयातून येते हे वेगळे सांगण्याची गरज नाही असंही ते म्हणालेत.
“मुंब्र्याचा आव्हाड हा तर फणा काढलेला साप”; राज ठाकरेंनी केली आव्हाडांची नक्कल
दरम्यान, ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या कोणत्याही भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव येत नसल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांचा कधीही मंदिरातील हात जोडलेला फोटो आपल्याला बघायला मिळणार नाही, ते नास्तिक आहेत. अशी प्रखर टिका राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Read also:
- मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
- “ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
- आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
- “मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
- हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल