सातारा : अॅड गुणरत्ने सदावर्ते यांच्या अडचणीत आणखिनच वाढ झाली आहे. सातारा पोलिसांची गुणरत्ने सदावर्तेंना ताब्यात घेण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली असून त्यांचा ताबा आता सातारा पोलिसांकडे गेला आहे. त्यामुळे आज आर्थररोड करागृहातून सदावर्तेंना सातारा येथे नेण्यात येत आहे. सुरूवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यानंतर अजून दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती. अजून त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
गुणरत्ने सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलिसांकडून 7 ते 8 गाड्या बंदोबस्तासाठी आल्या होत्या. त्यात सुमारे 60 ते 70 पोलिसांचा बंदोबस्तात सदावर्तेंना सातारा येथे नेण्यात येत आहे. त्यांना आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे सातारा येथे नेण्यात येत आहे. त्यामुळे सातारा येथे दाखल होताच त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करत कोठडी वाढवून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
“मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
मागील वर्षी संपुर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलन खुप गाजलं होतं. त्यावेळी आणि आता एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षापुर्वी त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. त्यांचा ताबा आता सातारा पोलिसांकडे गेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाला सदावर्ते यांच्यामुळे लागल्याने आंदोलक कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्या घरांवर हल्ला केला. या आंदोलकांना भडकवण्यामागे सदावर्ते यांचाच हात असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला . त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आणि आता त्यांचा ताबा हा सातारा पोलिसांकडे गेला आहे.
Read also:
- उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- “मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
- “उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
- मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
- “ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर