मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवस गायब असणारे सोमय्या पुन्हा एकदा काल माध्यमांसमोर आले आणि त्यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला. आता यावर संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात त्यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
“उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, तुम्ही जनेतच्या पैशाचा अपहार केलेला आहे. टिव्हीसमोर येऊन मोठ्यामोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. याही पेक्षा भयंकर अशी तुमची प्रकरणे समोर येणार आहेत. हे लक्षात ठेवा. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात. त्यांचे पितळ उघडे पडलेले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
ते पुढे म्हणाले की, तेव्हा कोणी जर काही म्हणत असेल तर त्यांना म्हणू द्या. आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत. आयएनएस विक्रांतच्या पैशाचा 100 टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झालेले होते. तुम्ही जर खालच्या कोर्टोचा निकाल पहाल. तर आरोपी निर्दोष नाहीत. असंही ते म्हणाले.
“ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also:
- हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
- “कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
- सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
- उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- “मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर