ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी या सभेत पुन्हा मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली. तसेच त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर देखील हात घातला. यामुळे त्यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतु भाजपला पुन्हा नव्याने घेण्याची गरज नाही, कारण भाजपचा हा सुरूवातीपासूनचा मुद्दा राहिला आहे. आजतागायत आजपर्यंत हिंदुत्त्वाचे अनेक मुद्दे भाजपने प्रखरपणे मांडले आहे. हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे. असंही ते म्हणालेत.
“ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने खोटं पसरवण्यासाठी इको सिस्टिम सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते समान खोटं बोलून ते खरं कसं आहे, हे जनतेला भासावून देण्याचा प्रयत्न या इको-सिस्टीमच्या माध्यमातून करत आहेत. असंही ते म्हणालेत. राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपची बी टीम असल्याचं खोटं महाविकास आघाडी आपल्या इको-सिस्टिमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पंरतु राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.
आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
दरम्यान, ठाण्यातील उत्तर सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की शरद पवारांच्या भाषणांत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येत नाहीत. त्याचबरोबर त्यांचा कधीही मंदिरातील हात जोडलेला फोटो आपल्याला बघायला मिळणार नाही, ते नास्तिक आहेत. अशी प्रखर टिका राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Read also:
- “कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
- सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
- उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- “मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
- “उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”