मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबाबात इशारा दिला. येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजे नाहीतर आम्हाल जे करता येईल ते आम्ही करू, असा कडक इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला.
“ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर
संजय राऊत म्हणाले की, राजकीय व्यासपीठांवरून अशा प्रकारच्या घोषणा होत असतात. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे मजबुत आहे. आणि काय निर्णय घ्यायचा हे सरकारला माहीत आहे. कोणीही येऊन काहीही बोलतं आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतं. त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या. असंही ते म्हणाले.
आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त
त्याचबरोबर त्यांनी किरीट सोमय्यांवर देखील टीका केली. आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात त्यांच्यावर अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला. सोमय्या यांना अटकपुर्व जामीन मिळणं हा दिलासा घोटाळा आहे. न्यायालयाने जरी त्यांना दिलासा दिला असला तरी त्यांची निर्दोष मुक्ततात झालेली नाही. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्र तुरूंगात जाणारच असा त्यांनी पुन्हा एकदा पुनरच्चर केला.
“मालिकेत, चित्रपटात मनोरंजन असतं, तसं राज ठाकरेंनी भाषणात मसाला टाकला”
दरम्यान, राज्यात दोन ते तीन आठवड्यापासून राजकीय घडोमोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शरद पवार यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तर भाजपनेते प्रवीण दरेकर यांना देखील मुंबै बॅंक प्रकरणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच आता किरीट सोमय्यांनावर देखील अटकेची टांगती तलवार आहे.
Read also:
- सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
- उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- “मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
- “उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
- मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल