सातारा : साताऱ्यात माण खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्य़ामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
“मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर
महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अन्य 4 साथीदारांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. याची माहिती दहिवडी पोलिस उप विभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी दिली आहे.
“उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”
निलेश देशमुख म्हणाले की, महादेव पिराजी भिसे यांनी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय गोरे, महेश भोराटे व इतर जणांविरूद्ध तक्रार दिली आहे. अट्रोसिटी अंतर्गत कलम 3 A व भारतीय दंडनियम 420, 417, 467 या कलमांर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल
दरम्यान, याअगोदर देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका ओळख झालेल्या महिलेला व्हॉट्अपवरून शरीर सुखाची मागणी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या तक्रारीवरून गोंरेंविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 ऑगस्ट 2015 ते 1ऑक्टोबर 2016 या कालवाधीत जयकुमार गोरे यांनी 36 वर्षीय महिलेशी व्हॉट्सअपवरून अश्लील, घाणेरडे, मॅसेज, छात्रचित्र व व्हिडीओ क्लिप पाठविल्या होत्या.
Read also:
- “स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;
- हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, मात्र हिंदुत्व हा भाजपचा श्वास; चंद्रकांत पाटील
- “कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला
- सदावर्तेंचा ताबा आता सातारा पोलिसांकडे! 60 ते 70 पोलिसांच्या बंदोबस्तात साताराकडे रवाना
- उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल