मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आज एक वाजता ठाकरे सरकारमधील घोटाळा बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्याआधी संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना 100 कोटीचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
“या सरकारच्या काळात ऊसावर सुद्धा पक्षाचे शिक्के लादले गेले”; देवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात त्यांच्या कुटुंबाचा सहभाग आहे. युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून खोटी बिलं दाखवून सोमय्या यांनी हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मी लवकरच उघड करणार आहे. असा खळबळजनक आरोप त्यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. आज तुम्ही त्या आरोपीला प्रश्न विचारा. इलु इलु क्या है अंस आपण म्हणतो ना. तसं टॉयलेट घोटाळा काय आहे. असं त्या आरोपीला विचारा असंही ते म्हणाले.
स्वत:चा अनुभव सांगत रामदास आठवले म्हणाले.; “शरद पवार जातीयवादी माणूस नाही”;
किरीट सोमय्यांचा मी टॉयलेट घोटाळा लवकरच काढणार आहे. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवुन हा घोटाळा झाला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं . त्यांना भ्रष्टाचाराची फार कणव आहे. त्यांची भाजपवाल्यांची राष्ट्रभक्ती फार उचंबळुन येत असते. असं ते म्हणाले.
“जे कोणी आडवे येतील ते नष्ट होतील”; मोहन भागवत यांनी केलं अखंड भारताविषयी वक्तव्य
दरम्यान, आज किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी त्यात म्हटलं आहे की, आज दुपारी एक वाजत भाजप नरिमन पॉईंट ऑफिस मुंबई येथे पत्रकार परिषदेत मी ठाकरे सरकारचा आणखी एका घोटाळाच्या पर्दाफाश करणार. फेसबुकवर लाईव्ह दिसणार आहे. असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- आरोपींकडून खंडणी, पीडितेचा गैरफायदा, त्यांची जुनी पद्धत; राष्ट्रवादीचा चित्रा वाघ यांच्यावर धक्कादायक आरोप
- तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
- मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
- “मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
- फडणवीसांचं ट्विटर वादळ शरद पवारांवर धडकलं! लागोपाठ 14 ट्विट करत घेरलं