मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरू आहे. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात येत असून मनसेतर्फे पुण्यातील खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून साखळीपीर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे. यावरून आता आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.
राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
फुकटे सल्ले आणि फुकटचे इशारे आम्ही ऐकत नाही. काय करायचं आहे ते आपपल्या मंदिरात करा. दुसऱ्याचे बाप हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या बापाचा तुमच्यावर आश्रय आहे तो दिसतोय. अतिशहाणपणा वाढत चालला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नका. आम्ही शिवसैनिक अजून मेलेलो नाहीत. आम्ही आईचं दुध पिऊन आलो आहे. तुम्ही फक्त येऊन दाखवा. मग दाखवतो शिवसैनिक काय आहे. तुम्ही मातोश्रीवर येऊन तर दाखवा, असं खुल आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
रवी राणा म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचं विचार आणि दिशा विसरले असतील. तर आम्ही खासदार आणि आमदार मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करू आणि बाळासाहेबांचं विचार जागृत करू. मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे असंही ते म्हणाले.
तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसा पठण होत नसेल तर चुकीचे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. ते दुसऱ्या दिशेने भरकटले आहेत. आणि त्यांना बाळासाहेबांच्या विचारावर चालून राज्याला दिशा द्यावी, असं रवी राणा म्हणाले. त्यावर शिवसेनेवर रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
- मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
- सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
- पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
- राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन