पुणे : मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसे घेतलेली भूमिका राज्यात आता चांगलीच जोर धरू लागली आहे. उद्या पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. तर मनसेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. यातच आता पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर
मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आधी राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यामुळे मनसेकडून आता हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जायचं की नाही अजून ठरवलं नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मनसेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. अशातच उद्या वसंत मोरे उद्या सकाळी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हनुमान चालिसा पठण कार्यक्रम पत्रिकेवर कुठेही मनसेच नाव नाही. तो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही हे माहीत नसल्याने अजून त्या कार्यक्रमाला जायचं की नाही हे ठरवलं नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
मनसेच्या अल्टिमेटलमा गृहमंत्र्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता; म्हणाले, ज्या ठिकाणी भोंगे लागतील..;
पुण्यात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे . या उत्सवास राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार असून राज ठाकरे यांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे. तसेच सामूहिक महाआरती देखील होणार आहे.
“मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार
दरम्यान, उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या पुण्यातील खालकर चौकातल्या हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून साखळीपीर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी इफ्तार पार्टी करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात राजकीय वातावरण ढवळून निघाण्याची शक्यता आहे.
Read also:
- सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
- पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
- राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन
- राऊतांचा सोमय्यांवर 100 कोटीचा नवा टॉयलेट घोटाळा; लवकरच उघड करणार: संजय राऊत
- आरोपींकडून खंडणी, पीडितेचा गैरफायदा, त्यांची जुनी पद्धत; राष्ट्रवादीचा चित्रा वाघ यांच्यावर धक्कादायक आरोप