नागपूर: महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. ते ठाकरे सरकारचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे मार्गदर्शकही आहेत. तेच पुढेही राहतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दररोज इकडे-तिकडे काय-काय बोलतात. त्यावर आम्ही रोज-रोज काय उत्तर द्यायचे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला. शुक्रवारी ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
हे पण वाचा: “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
पटेल म्हणाले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे शरद पवार यांना भेटायला गेले होते. तेव्हा पवार हे पटोलेंबाबत जे काही बोलायचे ते बोलले. त्यानंतर एच. के. पाटील यांनी दिलेला इशारा तुम्हाला माहीतच आहे. पटोलेंच्या बोलण्याने खूप फरक पडत नाही. मला काँग्रेस प्रभारी पाटील काय म्हणतात, हे जास्त महत्वाचे आहे. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात, अशी रोखठोक भूमिका पटेल यांनी मांडली.
हे पण वाचा: मोठी उलथापालथ: नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा मनसे राज येणार? ठाकरेंच्या भुमिकेकडे लक्ष…
शिवसेनेत कोण नाराज आहे हे माहीत नाही, पण आमच्या पक्षात कुणी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे कन्सल्टंट आहेत. भाजपचेही होते. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांनी कन्सल्टन्सी सोडली असल्याचे स्पष्ट केले आहे. ते कुणाला भेटत असतील तर भेटू द्या. शेवटी राजकारणाची दिशा कुण्या एका व्यक्तीमुळे ठरत नसते, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत राजकीय घडामोडी घडत आहेत.
हे पण वाचा: मेट्रोविरोधात आंदोलन, भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
महामंडळांवरील नियुक्त्यांचा फार्म्युला ठरला
महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळांसह इतर समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी एक फार्म्युला ठरला आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार व शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या सहा नेत्यांनी आपसात बसून कोणत्या पक्षाकडे कोणते महामंडळ राहील, हे ठरवायचे आहे. त्यानुसार आपापल्या कोट्यातील जागा भरल्या जातील, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा: किरीट सोमैय्यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, महत्वाचे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता
प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्यातील विळ्याभोपळ्याचे नातं
राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील विळ्याभोपळ्याचे नात भंडारा गोदीयासह अख्या राज्याला चांगलच माहीत आहे. सध्या स्वबळाचा नारा देत पटोले यांनी राष्ट्रवादीला शिगावर घेतले आहे. पटोलेंना रोखण्यासाठी भाईजीनी पुन्हा एकदा कंबर करली आहे. पटोलेंच्या वक्तव्यांनी पवार साहेब नाराज असल्याचे ओळखून पटेलांनी पटोलेंना टोले हाणले. शेवटी मनात जुना राग पटोले राष्ट्रवादीला आव्हान देऊन राष्ट्रीय नेते असलेले पटेल पटोलेंना गावातच गुरफटून ठेवण्याच्या बेतात आहे. पटेल-पटोले यांच्यात पुन्हा टोलेबाजी सुरु झाल्याने आघाडीती घडी विस्कटणार तर नाही ना, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.