नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेत मोठी उलथापलथ होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरेंकडेच जाणार असून त्याबाबतची आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
आदित्य शिरोडकर यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. शिरोडकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंकडे जाण्याची शक्यता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे तातडीने नाशिकला दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेऊन हे दोन्ही नेते विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा करणार आहेत. कदाचित राज ठाकरे दुपारी पत्रकार परिषद घेऊन अमित ठाकरे यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
मुंबई महापालिकेसाठी पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिरोडकर यांनी पक्ष सोडल्याने विद्यार्थी संघटना खिळखिळी होऊ नये म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची धुरा दिल्यास विद्यार्थी संघटना डॅमेज होणार नाही, उलट तरुणाईचा मनसेकडे ओघ वाढेल. तसेच विद्यार्थी संघटनेचा पालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत उपयोगही करता येईल. त्यामुळे अमित यांच्याकडे विद्यार्थी संघटनेची सूत्रे दिली जाऊ शकतात, असं सांगितलं जातं.
मंत्रालयात जायला वेळ नाही. लॉक डाउन मुळे लोक आत्महत्या करतायत तिथे बघायला वेळ नाही. बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. आणि करोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला सर्वात पुढे.आमचा मुख्यमंत्री जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 17, 2021
Read Also :
- किरीट सोमैय्यांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, महत्वाचे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
- “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
- स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका