मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावे लागलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड, पुन्हा मंत्री मंडळात कमबॅक करण्याच्या चर्चांना सध्या राज्याच्या राजकारणात उधाण आले आहे. पुण्यातील वानवडीजवळील महंमदवाडीत ७ फेब्रुवारीला पूजाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर अनेक वेळा या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका
यातच, आता या प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे नवीन जबाब नोंदवला असून, “पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी या जबाबात म्हटले आहे. तसेच, तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसून, आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार म्हणजे राजकीय नाट्य आहे,” असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणात आरोपी असलेल्या संजय राठोड यांना क्लीन चिट मिळणार असल्याचे बोलले जाऊ लागले.
फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
दरम्यान, या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली असून, पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी, “पोलिस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. त्यात माझा किंवा सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही किंवा दबाव नाही. या प्रकरणी पोलिसांनी कोणाला अहवाल दिला, यासंदर्भात मला माहिती असण्याचे कारण नाही. या घटनेची संपूर्ण चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यावर याबाबत अधिकृतपणे भाष्य करता येईल,” असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
…अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
दुसरीकडे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पुणे पोलिस देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे, पूजाचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या? हा सवाल अजूनही अनुत्तरीतच आहे. तसेच, या सर्व घटनेचा तपास अजूनही संथ गतीने का सुरु आहे?, यात राजकीय हस्तक्षेप होत आहे का?, याचा देखील खुलासा होणे गरजेचे आहे.
Read Also :
- “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
- लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
- राष्ट्रवादीने केली खेळी, इंदापूरात भाजपला मोठा धक्का! हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणीत वाढ?
- मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल