मुंबई : सध्या सत्तेतील महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आणि मंत्र्यांची, केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचा सपाटा सुरु आहे. कालच १०० कोटी वसुली प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तब्ब्ल ४ कोटी ७० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Thackeray Sarkar's Housing Ministry VASULI Racket. Vasuli Rate ₹100/ Sq Feet from 100 Builders of SRA, MHADA.
Pravin Kalme is "Sachin Waze" of Housing Minister Jitendra Awhad. SRA Officials accompanies Kalme
I filed 100 page complaint to ADG Prabhat Kumar of ACB to do needful pic.twitter.com/qmAJ3aKAlw
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 1, 2021
“गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रवीण कलमेच्या मदतीने वसुलीचा धंदा मांडला होता. कलमे हा आव्हाडांचा सचिन वाझे आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. “लॉकडाउन काळात आरटीआय कार्यकर्त्याच्या मागणीवरुन ६ दिवसांत ८१ प्रकल्पांचे अहवाल तातडीने का मागण्यात आले? आव्हाड आणि कलमे यांचा नेमका संबंध काय, याचा खुलासा करण्यात यावा,” असं म्हणत त्यांनी, “लॉकडाऊन असताना SRA मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.” असा गंभीर आरोप सोमैय्यांनी केला आहे.
लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
“गृहनिर्माण मंत्र्यांनी अशा प्रकारे दबाव आणून पदाचा दुरुपयोग केला. माहिती अधिकाराच्या कायद्याचा त्यांनी भ्रष्टाचारासाठी दुरुपयोग केला. अशाच पद्धतीचे अर्ज हे म्हाडा आणि मुंबई महापालिकेतही करण्यात आले असून, या पद्धतीने प्रशासनावर दबाव आणण्यामागचा नेमका हेतू काय? आव्हाड-कलमे यांची जोडी ही देशमुख-वाझे यांच्यासारखी आहे का? मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांकडून खुलासा मागवावा, किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी थेट मागणी मागणी सोमैय्यांनी केली आहे.
अनील देशमुख ₹१०० कोटीचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात गुंतले आहे. आज ईडीने 420 लाख ची मिळकत जप्त केली, हळू हळू ₹100 कोटींची मालमत्ता जप्त होणार
मला खात्री आहे की एके दिवशी अनिल देशमुखला ईडीकडे हजर व्हावे लागणार आणि नंतर जेलला जावे लागेल @BJP4Maharashtra pic.twitter.com/DyEBMcm0tM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 16, 2021
राष्ट्रवादीने केली खेळी, इंदापूरात भाजपला मोठा धक्का! वाढले राजकीय बळ
तसेच, “ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीच्या फेऱ्यात आहेत. ठाकरे सरकारमध्ये किती जोड्या आहेत हे आता समोर येत आहे. त्याचा अजून शोध घेतला जाईल,” असा इशारा देताना त्यांनी, “अनिल देशमुखांची जुनी मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू २०२०-२१ च्या मालमत्ताही सापडतील, असा टोला लगावत, “अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार,” असा मोठा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
माजी खासदार श्री. किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद. https://t.co/eBzmqmUUxC
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 16, 2021
…अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी, “मिलिंद नार्वेकर यांनी, अनिल परब यांच्या घरापासून काही फुटांच्या अंतरावर, पर्यावरणाचे नियम तोडून आणि अनधिकृतपणे बंगल्याचे बांधकाम केले असून, याची किंमत १० कोटी रुपये आहे. याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहमती असून, खोट्या कायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन, ही बांधकामे लॉकडाऊनच्या काळात केली गेली आहेत,” असे गंभीर आरोप करत, “या अनधिकृतपणे बांधलेल्या बंगल्यांची व्हायला हवी,” अशी मागणी केली होती.
Read Also :
- राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट? गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण विधान
- “प्रविण तू तर चॅम्पियन आहेसच तुझे आई-वडिलही चॅम्पियन आहेत”, नरेंद्र मोदींकडून कौतुक
- स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका
- फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!