मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यानंतर मोठा राडा बघायला मिळला. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात थोडी अधिक बाचाबाची देखील झाल्याचं दिसलं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील प्रतोद आणि आमदार भरत गोगावले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
“केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये”; पृथ्वीराज चव्हाणांचा पक्षाला घरचा आहेर
विधानसभेच्या पायऱ्यांवरील राड्यासंदर्भात ते म्हणाले की, परवा काय झालं सांगतो. ओके, पन्नास खोके, ओरडत होते. आम्ही आमच्या स्टाईलनं उत्तर दिलं तेव्हा ते गर्भगळीत झाले. लवासाचे खोके, बारामती ओक्के, अनिल परबांचे खोरे, मातोश्री ओक्के, अशा घोषणा आम्ही दिल्या. आम्ही सांगितलं की आमचा नाद करायचा नाही. आम्हाला पाय लावायचा नाही. त्या मिटकरीला आम्ही पिटकरी करून टाकलं. आता 7 सप्टेंबरला शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण निशाणीची तारिख आहे. यावेळी या सर्वांना कळेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेवर शिंदे गट दावा करीत आहेत. याबाबत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. यावर रत्नागिरीच्या एका कार्यक्रमात बोलताना भरतशेठ गोगावले बोलताना म्हणाले की, आम्ही मुळेच शिवसैनिक आहोत. 7 तारखेला याबाबतीत निकाल येणार आहे. धनुष्यबाण आमचा आहे. असा दावा देखील त्यांनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हटले की, या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. आता 12 तारिख आली, 22 ता 4 ते 5 वर्ष हे चालेल. दुसरी निवडणुकही 2024 ची आपण जिंकू अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पुन्हा मोदीच! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी अव्वलस्थानी
दरम्यान, पावसाळी अधिवेशना दरम्यान विरोधकांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. शिंदे गटातील आमदारांचा विरोधक नेहमी गद्दार गद्दार म्हणून उल्लेख करीत होते. त्याचाच बदला म्हणून शिंदे गटातील आमदारांनी देखील त्यांच्याविरोधात घोषणाबाजी दिली. त्यामुळे त्याठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Read also
- “तारिख पे तारिख, हे प्रकरण 4 ते 5 वर्ष चालेल, मग आम्हीच निवडणुका जिंकू”; शिंदे गटाचा दावा
- “रोहिणी खडसे आल्या आता पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावे”; राष्ट्रवादीची पंकजा मुंडेंना ऑफर
- “कुठून येत असेल, इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे”? पाक-भारत मॅच दरम्यान शरद पवारांचा जल्लोष
- “झंडू बाम घेऊन ठेवा”; संभाजी ब्रिगेडचा भाजपवर हल्लाबोल
- “हेच अडाणी लोक महाराष्ट्राचे वाटोळे करणार”; रूपाली ठोंबरे-पाटील