IMPIMP
bjp bjp

लपून उत्तर काय उत्तर देता? चर्चेला कुठेही बोलवा, मी तयार, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुपचूप मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला यावं यासाठी आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असं खुलं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे.

कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरुन भाजपनं आता शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं कांजूरमार्गची जागा आमची असल्यामुळं राज्य सरकारनं मेट्रोचं काम थांबवण्याचं पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

 

मेट्रो कारशेडवरुन राजकारण तापलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे.

केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

Read Also :

‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’

रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात

व्लादिमिर पुतीन यांना गंभीर आजार , राष्ट्रपतीपद सोडणार ?

‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?

“सैफी इस्पितळातील कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत ठोस निर्णय इस्पितळ प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कायदा हातात घेत रहाणार” – गजानन राणे