मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. एवढंच नाही तर शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांना देखील ‘बॉय’ म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इथं बॉय म्हणून काम करत होते संबोधल होतं.
२५ हजार कोटींचा घोटाळा करणारा अमोल काळे लंडन’ला गेला का? काँग्रेसच्या सवालाने भाजपात खळबळ
यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर यांनी लगेच ट्विट करून ‘बॉय’ म्ह्टल्यावरून राणेंना उत्तर दिले होते. मिलिंद नॉर्वेकर यांनी ट्विट करत म्हटलं होतं की याच बॉयला नारायण राणे यांनी त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासंदर्भात ७ वेळेस फोन केले होते. आता तुमच्या मेमरीची घंटी वाजली का? असा सवालही नॉर्वेकर यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तत्परता दाखवत सुशांतसिंह राजपूत हत्याप्रकरण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांमार्फत त्यांना २ फोन केल्याची आठवण करून दिली. आता राणेंनी केलेल्या ट्विट प्रकरणी माजी गृहमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.
पुण्यात शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या; उपनेता कुचिक यांच्या विरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे अत्यंत बोगस प्रकरण होत. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी त्यावेळी काही राज्यांत या प्रकरणी केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही पुढं काय तपास केला ? हे सांगण्यात आलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर तर केला मात्र पुरावे भेटलेच नसल्याने यंत्रणांनी माघार घेतली. त्यामुळं राणेंनी थोडं तारतम्य बाळगून बोलावं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ज्या कुटुंबाने त्यांना घडवलं त्यांना अडचणीत आणण्यासाठी असे केविलवाणे प्रयत्न करू नयेत. या कुटुंबामुळेच ते मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले. त्यामुळे या कुटुंबाबाबत वक्तव्य करताना जीभ थोडी चाचरु द्या असा टोला देखील दीपक केसरकर यांनी मंत्री राणेंना हाणला आहे.
Read also:
- शिवसेनेवर शोककुळा: जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींच राहूल गांधींना पत्र
- अब्रु नुकसानीच्या दाव्यांच्या हेलपाट्यांनीच तुम्ही मरणार – चंद्रकांत पाटील
- हिंदुस्थानी भाऊ’ला अखेर सशर्त जामीन मंजूर, काय आहे नेमकं प्रकरणं… वाचा सविस्तर…
- पुणे महापालिकेतील 6000 कोटींचा संशयास्पद व्यवहार; राष्ट्रवादीची एसीबीकडे तक्रार दाखल