मुंबई : मागील काही दिवसापासून वेदांता फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य़ ठाकरे हे देखील पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. मात्र या सर्व प्रकराणामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नेमकी कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रश्न खुप आहेत पण गेले काही दिवस राज्याचे विरोधी नेते आहेत तरी कुठे? असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
“बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
महाराष्ट्रातील बाहेर गेलेले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारमुळेच गेले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून गेला जात आहे. तर वेदांता फॉक्सकॉन, एअरबस हे प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्काळजीपणामुळेच गेले असल्याचा आरोप विरोधकांकडून गेला जात आहे. याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तर त्याला लगेचच आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र अजित पवारांची भूमिका अद्यापही स्पष्ट झाली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
“कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील या प्रश्नांकडे मुद्या वळविला आहे. ते म्हणाले की, प्रश्न खुप आहेत पण गेले काही दिवस राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा आहेत कुठे? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. अजितदादा आमचेच हे सरकार स्थापन करताना सभागृहात आताचे मुख्यमंत्री बोलले होते. ते खरं की काय? असा उपरोधिक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच दिल्लीमध्ये साहेबांनी बोलू न दिल्याचा राग दादांच्या मनात अजून आहेच ? अस म्हणत त्यांनी अजित पवारांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह महाराष्ट्रातील प्रकल्प आघाडी सरकारमुळे गेल्याचे दाखविले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे यांनी देखील मागील उद्योग मंत्र्यांनी केलेले प्रयत्न त्याचे पुरावे पत्रकार परिषदेत दाखविले. यावरून राज्यात महाभारत सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते गेल्या अनेक दिवसापासून गायब आहेत. आज अजित पवारांनी शिर्डी येथील साईबाबाचे दर्शन घेतले. त्यामुळे आता तरी यावर अजित पवार आपली भूमिका स्पष्ट करणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातली विकृती
- “मग मिश्या काढणाऱ्याना नपुंसक समजतात का ?” राष्ट्रवादीचा भिडेंना खोचक सवाल
- “दोन कोटीचं घड्याळ सापडलं ते कुठं होतं..”; सुषमा अंधारेंची सोमय्या स्टाईल टोलेबाजी
- “दादा तुम्ही फक्त पुण्याचे मंत्री नाही, महाराष्ट्राकडेही लक्ष्य द्या”
- “आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद