मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयासमोर वादग्रस्त वक्तव्य केले. टिकली लावली नाही म्हणून त्यांनी एका महिला पत्रकाराशी बोलणं टाळलं. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. आज दिवसभर त्यांच्यावर टिका करण्यात आली. यावरूनच राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देखील त्यांच्यावर प्रहार केला आहे.
नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर
टिकली लावली नाही म्हणजे विधवा समजतं असतील तर मग मिश्या काढणाऱ्याना नपुंसक समजतात का भिडे तसं समजत असतील तर मग मिश्या असून लग्न न करणाऱ्याना आम्ही काय समजायचं? असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला आहे. तसेच मुॅंछ की लंबाई से मर्दागनी नहीं नापते. असं म्हणत टिकलीवरून स्त्रीचा सन्मान करायचं ठरत नाही. त्यासाठी योगदान महत्वाचं, टिकली नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.
गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर..! भाजपची सत्ता पणाला, तर केजरीवाल धमका करणार?
ही तर आहे डबल ढोलकी भूमिका, असं म्हणत माता भगिनींचा अपमान करणारे हे कसले हिंदुत्व? असा सवाल देखील रविकांत वरपे यांनी केला आहे. तसेच शिंदे फडणवीस भिडेला अटक करा. अशी मागणी देखील रविकांत वरपे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर न बोलणारे वायफळ आरोप, दिशाभूल करणारे टिकलीवरून महिलांना अपमानित केले त्यावर काही बोलणार का? असं म्हणत रूपाली पाटील यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे सवाल केला आहे. महाराष्ट्रातील आया बहिणीचा सन्मानचा, स्वांतत्र्यचा, सक्षमतेचा प्रश्न आहे. का तुमच्याच घरच्या महिलांना सन्मान, सुरक्षा आणि बाकीच्यांचे शोषण? असा उपरोधिक टोला देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला हाणला आहे.
“बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे, ते जर दम देत असेल तर..; 2 दिवसात राणांचा रवैया बदलला
दरम्यान, संभाजी भिडे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाची बैठक असल्याकारणाने संभाजी भिडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जास्त काळ चर्चा झाली नाही. त्यामुळे संभाजी भिडे लगेचच मंत्रालयाच्या बाहेर आले. त्यानंतर काही पत्रकारांनी संभाजी भिडे यांना प्रश्न विचारले. त्यातच महिला पत्रकारांनी सवाल केल्यानंतर टिकली लावली नाही म्हणून त्यांनी प्रश्नांचं उत्तर देण्याचं टाळलं.
Read also
- “दोन कोटीचं घड्याळ सापडलं ते कुठं होतं..”; सुषमा अंधारेंची सोमय्या स्टाईल टोलेबाजी
- “दादा तुम्ही फक्त पुण्याचे मंत्री नाही, महाराष्ट्राकडेही लक्ष्य द्या”
- “आता पोलिस भरती, महिनाभरात ग्रामविकास विभागाची भरती”; फडणवीसांनी विरोधकांची केली बोलती बंद
- “बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
- “कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं