मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लावणार आहेत. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचे भवितव्य या निकालावर ठरणार असून कोणत्या गटाच्या बाजूने निकाल येणार ? त्याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. यासंदर्भात आता राज्यात वेगाने हालचाली वाढल्या आहेत. तर प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी या प्रकरणाबाबत दोन शक्यता वर्तवल्या आहेत.
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
शिवसेना आमदार अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर आहे. तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल. तर दुसरी शक्यता अशी आहे की कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील. असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
दरम्यान, विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर देखील या बैठकीसाठी उपस्थिती होते. तर शिंदे गटाच्या मुंबईतील सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात एकत्र बोलावण्यात आलं आहे. दुपारी ३ वाजता एकत्र येण्याची सूचना सर्व आमदारांना देण्यात आली आहे. तेथून सर्व आमदार विधानभवनात जातील.
अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर.तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील.
— Asim Sarode (@AsimSarode) January 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री