मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. केवळ आपले फोटो शेअर करण्यापुरता सोशल मीडियाचा वापर न करता, ती या प्लॅटफॉर्मवर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांबाबत आपलं मतही मांडत असते. यामुळे ती बऱ्याच वेळा चर्चेत राहते, तर कित्येक वेळा ट्रोलही होते. आता पुन्हा एकदा सोनम कपूर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांच्यावर टीका केल्यामुळे चर्चेत आली आहे. एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर) समुदायातील लोकांबाबत मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोनमने त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं आहे.
अखेर मुंडे साहेबांसह बीडकरांच स्वप्न सत्यात उतरलं; अहमदनगर ते आष्टीदरम्यान धावली ट्रेन
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटीक्यू समुदायाबाबत विवादास्पद विधान केले होते. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाबाबत ते बोलत होते. या विधेयकात एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांनाही विद्यापीठ बोर्डावर येण्याची परवानगी मिळण्याबाबत सुधारणा करण्यात आली होती. यावर विरोध दर्शवत मुनगंटीवार म्हणाले, ‘आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेणार का? यासाठी खरं तर एक संयुक्त वैद्यकीय समितीची स्थापना करायला हवी. यात (विधेयकात) बायसेक्शुअल आणि असेक्शुअल संबंधांचा उल्लेख आहे. पण याची व्याख्या अद्याप कोणीच केली नाही.’ एवढ्यावरच न थांबता, मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘जर एखाद्या व्यक्तीचे एखाद्या प्राण्यासोबत असेक्शुअल संबंध आहेत, तर तो प्राणी येऊन सांगणार आहे का, की आमच्यात असेक्शुअल संबंध होते? काय चाललंय हे?’
‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!
अधिवेशनातील मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एलजीबीटीक्यू समुदायासोबतच इतर नेटीझन्सही त्यांच्यावर टीका करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूरनेही ‘येस वुई एक्झिस्ट इंडिया’या इन्स्टाग्राम पेजची पोस्ट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत मुनगंटीवार यांना ‘अज्ञानी, अशिक्षित आणि तिरस्करणीय’ म्हटले.
महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
दरम्यान, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले. ‘सर्वोच्च न्यायालयाने समान संधींबाबत कित्येक निर्णय जाहीर केले आहेत. या (असेक्शुअल) मुद्द्यावरून मुनगंटीवार हे सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही या विधेयकातील सुधारणेतून काहीही नवीन करत नाहीये. देशात विविध ठिकाणी अशा प्रकारचे कायदे लागू करण्यात आलेले आहेत. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच सुधारणा विधेयक मांडले आहे.’
Read also:
- सिंधुदुर्गप्रमाणे राज्यातही महाविकास आघाडीची तीनचाकी रिक्षा पंक्चर होणार – चंद्रकांत पाटील
- ‘मन भरकटले की अशी माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात’, सुधीर मुनगंटीवार यांना संजय राऊतांचा खोचक टोला
- “नॉट रिचेबल” नितेश राणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह; सतीश सावंत यांच्या पराभवावर राणेंची पोस्ट
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली