संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे.
या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. फेसबुक पोस्टमध्ये भाजप आमदार नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर ‘गाडलाच’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जोरदार चूरस रंगली होती. महाविकास आघाडीला 4 तर, भाजपला 4 जागा मिळाल्यात. कणकवलीत अटीतटीच्या लढतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाल्यानं ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर केला आणि नशिबाची साथ भाजपच्या विठ्ठल देसाईंना मिळाली. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ‘गाडलाच’ या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
नितेश राणेंना दुहेरी धक्का, आधी पोलिसांचा आणि आता सहकार विभागाचा दणका
दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणानंतर नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस शोधत आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, ते पोलिसांपुढे आलेले नाहीत. ते अज्ञातस्थळी आहे. मात्र, त्यांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली.
नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील बॅनरवर लिहिले आहे की, ‘भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस’. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर कोणी लावले असेल, याची जोरदार चर्चा शहरात करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपने हे पोस्टर काढून टाकले आहे.
Read also:
- कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली
- महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!
- हुर्ररररर… हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?