मुंबई : गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा आणि युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालं आहे. अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत आहेत. तसंच यूट्युबवरही एरर येतो आहे आणि जीमेलवरही एरर येतो आहे. आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येतो आहे. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे.
मात्र जगातल्या अनेक ठिकाणी गुगल, जीमेल आणि युट्यूब या तिन्हीवर अॅक्सेस करण्यास युजर्सना समस्या जाणवत आहेत. हा फटका नेमका कशामुळे बसला आहे? गुगल, युट्यूब आणि जीमेल का डाऊन झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला “something went wrong” हा मेसेज येतो आहे. जगातल्या काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे असंही समजतं आहे. मात्र जीमेल आणि युट्यूब यांना एरर येतो आहे.
दरम्यान युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला आहे. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले आहेत. युट्यूब, जीमेल आणि गुगल डाऊन झाल्यानंतर जे ट्रेंड सुरु झाले आहेत त्यामध्ये अनेक युजर्सनी मीम्सही तयार करुन ट्विटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
Read Also :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’
गोपीचंद पडळकर यांचं धनगरी वेष परिधान करुन ढोल वाजवत आंदोलन
… तर या शेतकऱ्यांशी चर्चा का करत आहात ? चिदंबरम यांचा मोदी सरकारला खोचक सवाल