IMPIMP

जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

औरंगाबाद : खासदाराच्या मतदारसंघात विकास निधी देण्यासाठी जिल्हा परिषदच्या बांधकाम सभापतीने चक्क ५ टक्के कमिशन मगितल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली असून, थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टॅग करत लक्ष देण्याची मागणी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले

जलील यांनी ट्विट करता म्हटल की, माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी देण्यासाठी बांधकाम सभापती बलांडे ५ टक्के मागत आहेत. असे भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत. कृपया हे थांबवा, असं जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

तर यावर माध्यमांना बोलताना जलील म्हणाले की, रस्त्यासाठी साडेआठ कोटी निधीचे जि.प. कडे प्रस्ताव दिले, पालकमंत्र्यांनी निधी वाटपाची यादी अंतिम केल्याचे सांगून सभापती बलांडेंनी ५० लाख रुपये दिल्याचे सांगितले. माझ्या माणसाकडे ५ टक्के कमिशन मागितले. मी बलांडेंना फोन केला असता त्यांनी माझ्याकडेही कमिशन मागितले. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले. दरम्यान, बलांडेंनी स्वत:वरील आरोप फेटाळून लावले असून खासदार जलील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचं सांगितलं आहे.

Read also:

Total
0
Shares
Previous Article

...तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर

Next Article

आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर

Related Posts
Total
0
Share