जळगाव : मुंबईतील संजय राऊत आणि किरीट सोमय्या आणि नारायण राणे जो राजकीय वाद सुरू आहे, तसाच काहीसा वाद उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात सध्या कलगीतुरा सुरू आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका प्रचारासाठी या नेत्यांना मध्ये सध्या राजकीय वाक़युद्ध रंगलं आहे.
35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही. त्यावर आता एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. बाळ एकाचे, बारसं दुसऱ्याचे, आणि डफडं गुलाबरावांचं असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, गुलाबराव तुम्ही नाव लावुच नका, कारण तुमच्या पहिल्या नावातच घाण आहे. नाथाभाऊला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. परंतु नाथाभाऊ हरणार नाही. बोदवडमध्ये भाजपासोबत छुपी युती करून सत्ता काबीज केली. परंतु आता तसे होणार नाही. तसेच जो शक्तीमान असतो त्याच्याविरोधात सगळे जकत्र येतात कारण ते त्याला हरवू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.
लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील राजकीय पक्ष विविध ठिकाणी पक्षाचे मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांमध्ये राजकीय पक्ष एकमेकांनावर चिखलफेक करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसुन येत आहे.
Read also:
- राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?
- भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?