पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आयोगासमोर येत्या काही दिवसात आपली बाजू लेखी पत्राद्वारे कळवणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार हे आयोगासमोर काय माहिती देणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
नवाब मलिक म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलवले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे कशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे शरद पवार नक्कीच आयोगासमोर हजर होतील.
देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
पुण्यात १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव याठिकाणी हिंसाचार घडून आला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळीच्या देखील घटना घडल्या होत्या. त्यामुळे हा हिंसाचार संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे झाला असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी अँड प्रदीप गावंडे यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांना समन्स पाठवत त्यांना साक्ष नोंदवण्यास सांगितले.
35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
या अगोदर देखील शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. भीमा कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ एल्गार परिषदेच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी हिंसाचार झाला होता. त्यावेळी झालेल्या या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच काही संघटनांनी बंद पुकारल्याने काही दुकानांची देखील जाळपोळ करण्यात आली होती. तेव्हा अनेक व्यक्तींना या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी अटक केली.
Read also:
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
- सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश