पिंपरी-चिंचवड : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य राममंदिराच्या कामाला गतवर्षी सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून निधी जमा केला जात आहे. भाजपचे कार्यकर्ते देशभरातून निधी संकलनाचे काम करत आहे. अनेकजण स्वेच्छेने देखील मंदिराच्या उभारणीसाठी दान करत आहेत.
राजकीय नेते देखील यात मागे नसून राममंदिरासाठी भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय महामंत्री विनायक देशपांडे यांच्याकडे हा निधी सुपूर्त करण्यात आला.
अयोध्या येथील भव्य राममंदिर निर्माणासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी आज श्री विनायक जी देशपांडे (विश्व हिंदू परिषद अखील भारतीय महामंत्री) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला!#RamMandirNidhiSamarpan @bjpforpcmc @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/nfu19i3SX8
— Mahesh Kisan Landge (@maheshklandge) January 31, 2021
राममंदिरच्या उभारणीसाठी निधी संकलनासाठी भाजप आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता.
दरम्यान, यावेळी महापौर माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा सौ उमा खापरे, रा. स्व. संघ पुणे जिल्हा कार्यवाह श्री मुकुंद कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य भाजपा सचिव अमित गोरखे व अन्य नगरसेवक तथा पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also :
- भाच्याला मुख्यमंत्री करणे हाच ममता बॅनर्जींचा अजेंडा, अमित शहांचा हल्लाबोल
- तात्याराव लहानेंच्या फडणवीस सरकारवरील ‘त्या’ आरोपांवर दरेकर म्हणाले…
- … त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो – रोहित पवार
- राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर
- ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे प्रत्युत्तर