– राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते नवीन सेलिब्रेटी चेहऱ्याच्या शोधात
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. याचे थेट पडसाद उत्तर पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारावर उमटणार आहेत.
‘ज्यांना लुडबुड करायची असेल त्यांना करू द्या, म्हापश्याचे भवितव्य हे आमचे म्हापशेकर ठरवतील’
पुणे,पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यतील ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतरचा ब्रँड चेहरा म्हणून डॉ. कोल्हे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र गोडसे यांच्या भूमिकेवरून हा ब्रँड चेहरा आता बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षीय प्रचारासाठी आता राष्ट्रवादीचा नवा चेहरा कोण असेल? याची उत्सुकता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील राजकारणात अजित पवार यांच्यानंतर खासदार कोल्हे यांनी लक्ष घातले होते. मात्र, अजित पवार सध्या राज्याचे नेतृत्व करीत आहेत. परिणामी, शहर पातळीवरील राजकारणात लक्ष घालण्यासाठी त्यांना मार्यादा येत होत्या. परिणामी, अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शहरी भागातील सुशिक्षित मतदारांना खासदार कोल्हे आकर्षित करतील, अशी राष्ट्रवादीची रणनिती होती. मात्र, महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याच्या भूमिकेचे उदात्तीकरण केल्यामुळे कोल्हेंबाबत पुरोगामी विचारांचा मतदार नाराज आहे.
जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे
याउलट, पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंच्या भूमिकेचे समर्थक केले असले तरी, निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतील सेलिब्रेटी चेहरा म्हणून कोल्हे यांची क्रेझ आता कमी झाली आहे. अनेक विचारवंत , गांधीवादी विचारांच्या दिग्गज व्यक्तींकडून कोल्हेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे, ही वस्तुस्थिती आहे.
कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे
परिणामी, कोल्हे यांच्या या निर्णयावर सोशल मीडिया, राजकीय नेते आणि कार्यकर्ते टीका करीत आहेत. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून येत्या महिनाअखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या वादानंतर कलाकार म्हणून डॉ. कोल्हे त्यांच्या जागी योग्य आहेत अशी आपली भूमिका स्पष्ट केली.मात्र अभिनय की राजकारण यांची गल्लत डॉ. कोल्हे नक्कीच करून बसले आहेत असा एकंदरीत सर्वांचाच सूर आहे. त्यामुळे अभिनयात उत्तुंग यश मिळाल्यानंतर राजकारणाची वाट सुकर करणार्या कोल्हे यांच्याबद्दल त्यांच्या चाहता वर्गामध्ये नक्कीच नाराजी आहे. याचा याचा फटका आगामी काळातील महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक पंचायत समिती या सर्वांच्याच राजकारणावर कोल्हे यांच्या वक्तृत्वाचा करिष्मा चालू शकणार नाही हे आता उघड गुपित आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपाला आयते कोलित…
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी मतदार संघ डॉ. कोल्हे निवडून आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला आहे.त्यामुळे कोल्हे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने ‘ब्रँड’ चेहरा म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये पक्षीय प्रचारासाठी त्यांना विधानसभा निवडणुकीत, त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ही उतरवण्याची रणनीती सुरू केली होती. सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी कोल्हे यांनी भोसरीत आपला राबताही वाढवला होता. माजी आमदार विलास लांडे, नगरेवक अजित गव्हाणे यांनी कोल्हेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार लांडगेंची शिकार करण्याचा संकल्पही केला होता. मात्र, कोल्हेंमधील अभिनेता जागा झाला. गोडसेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भ्रमनिरास झाला. आगामी काळात खेड, आळंदी, चाकण नगरपालिकांच्या निवडणुका देखील लागणार आहेत. यामध्ये देखील कोल्हे निवडणुकीच्या प्रचारासाठी नक्कीच राष्ट्रवादीचे ‘ब्रँड फेस’ म्हणून सामोरे गेले असते. चांगल्या वक्तृत्वाचे धनी असलेले डॉ. कोल्हे राष्ट्रवादीचा प्रचाराचा हुकुमाचा इक्का म्हणून पाहिले जात असतानाच नथुराम गोडसे यांच्यावरील चित्रपटात भूमिका केल्यामुळे कोल्हे हे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. तर दुसरीकडे याचा परिणाम राष्ट्रवादीच्या एकंदरीत भूमिकेवर देखील पडणार आहे.त्यामुळे याचा मोठा फटका राष्ट्रवादीला येत्या काळात शहरात बसणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीविरोधी छुपा प्रचार करण्यासाठी भाजपाला आयते कोलित मिळाले आहे.
स्थानिक नेते द्विधा मनस्थितीत…
एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका दुसरीकडे लोकमानस अशा दुहेरी कात्रीत पिंपरी- चिंचवडमधील स्थानिक नेतृत्व सापडले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी डॉ. अमोल कोल्हे यांची युवकांमध्ये असलेली क्रेझ, मतदारांच्या नेहमीचा परिचयाचा प्रसिद्ध असलेला चेहरा म्हणून त्यांना निवडणुकांच्या रणधुमाळीत उतरविण्याची तयारी केली. असे असतानाच कोल्हे यांची ‘नथुराम ‘ भूमिका आपल्या अंगलट येण्याची भीती देखील आता त्यांना आहे. त्यामुळे स्थानिक नेते द्विधा मनस्थितीत असल्याचे चित्र आहे.
Read also:
- राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
- पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; अजित पवारांची मोठी घोषणा
- महाविकास आघाडी सरकारला आता जनताच निलंबित करणार; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
- किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी; संभाजी भिडे म्हणतात… अफ्फू-गांजाच्या शेतीला…
- न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल