मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. नाशिक येथील ठाकरे गटातील 12 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंची वाट धरली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा येथील निवासस्थानी पक्ष प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटातील 12 नगरसेवकांनी शिंदेंची वाट धरल्याने शिंदे गटातील प्रवक्ते नरेश मस्के यांनी ठाकरे यांच्यावर टोला हाणला आहे. मुंबईच्या सकाळच्या भोंग्याचे नाशिककर बारा वाजवणार आहे. नाशिक महापालिकेच्या 12 नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहे. सकाळी 8 वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे.
“त्यांनी परवानगी दिली नाही, तरी आम्ही मोर्चा काढणार”; अजित पवार राज्य सरकारविरूद्ध आक्रमक
दरम्यान, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्या अजय बोरस्ते यांच्या घरासमोर पोलीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोर अनेक कार्यकर्ते जमा झाले असून एकमेकांना पेढे वाटून आंनद साजरा केला जात आहे. तर अनेक जण भगवा झेंडा घेऊन मोठ्या घोषणा देत आहेत.
Read also
- “खिंडारवाल्या पक्षाला अजून किती खिंडार पाडायचं”; अब्दुल सत्तारांनी ठाकरेंना डिवचलं
- “वारकरी संप्रदायात तुषार भोसले नावाचं भामटं पोरगं आलंय, सावध रहा;” रूपाली पाटलांचा घणाघात
- “मग तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- “पुण्यात बायको दुसऱ्या सोबत पळून गेली मग…;” शरद पवारांना धमकी दिलेल्या आरोपीची कबुली
- “हा सर्व मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रकार सुरू आहे का ?” अन् अजित पवार संतापले