बीड : करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने दिला. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत शर्मा यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.
‘बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी’
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
Read Also :
- शरद पवार आमचे नेते होवून शकत नाहीत, पवारसाहेब देशाचे…..; संजय राऊतांचा स्पष्टीकरण
- जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, विजय मिळवून द्या; अजितदादांनी कंबर कसली
- शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, त्यातुन राष्ट्रवादीसोबत युती नको हाच आवाज येईल – सुधीर मुनगंटीवार
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत – शिवसेना
- काँग्रेसच्या २ नेत्याचे घोटाळे काढल्यास फडणवीसांच्या काळातील फाईल बाहेर काढणार – नाना पटोले