मुंबई : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने चांगलेच थैमान घातले आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा उच्छाद मांडण्यास सुरुवात करताना दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण ओमायक्रॉनचे सापडले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे आणि काही गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झालेली बघायला मिळत आहे. यासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेऊन चिंता व्यक्त केली आहे.
“बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
कोरोनाचा हा नवा विषाणू तीव्र वेगाने वाढत आहे. ब्रिटन, ब्राझील, अमेरिका अशा सर्वच देशांमध्ये ओमायक्रॉनचा विषाणू वेगाने पसरत आहे. विषाणूचे गंभीर परिणाम जरी नसले तरी त्याचा वाढण्याचा दर हा चिंताजनक आहे. विधिमंडळात ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २ मंत्र्यांना देखील यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे.इथं सर्व सुविधा, उपचार असतानाही मंत्र्यांना कोरोनाने गाठलं आहे त्यामुळे आता जनतेनेही काळजीपूर्वक वागावे आणि सर्व निर्बंधांचे पालन करावे.
‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
अधिवेशनात कोरोनच्या संकटामुळे आम्ही २५ महत्वाची विधायके मंजूर करून घेतली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शक्ती विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. अकृषी विद्यालयांमध्ये सवर्ण आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेणार विधायकही मंजूर करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाविषयी देखील निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यात येऊ नये यासाठी देखील शिफारस केली आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- ज्या गोपीनाथरावांनी तुम्हाला सत्तेत बसवले, तुम्ही त्यांच्याच मुलीला घरी बसवले – आमदार दिलीप मोहिते
- नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ? कालच्या सत्रात न्यायालायने अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली
- “मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले.
- “मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?
- अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…