दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता या बातम्यांना पुष्टी मिळाली असून, आज संध्याकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असून, एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
अखेर रावसाहेब दानवेंची पडली विकेट; तब्बल १० मंत्र्यांचे राजीनामे
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित होतंच. त्यांच्यासोबतच भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत. या केंद्रीय मंत्रिमंडळाचा अवघ्या २ तासात विस्तार होणार असून, केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची अधिकृत यादी आता जाहीर केली.
“खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
दरम्यान, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, त्यांच्या ७ रेसकोर्स या निवासस्थानी, संभाव्य नेत्यांशी मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत भाष्य केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
वडीलांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी; दोन्ही राणे बंधु दिल्लीत दाखल
या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलय पहिला मंत्रिमंडळ विस्तारात २७ ओबीसी आणि ५ अल्पसंख्याक समाजातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात या ४३ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. सध्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या ५३ आहे, ही वाढून आता ८१ होणार आहे.
कोण आहेत केंद्राचे ४३ नवीन सुशिक्षित चेहरे…
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
Read Also :
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?