दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता या बातम्यांना पुष्टी मिळाली असून, आज संध्याकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असून, नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
दरम्यान, राज्यातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित, भारती पवार यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत.
खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2021
दुसरीकडॆ, खासदार प्रीतम मुंडे या देखील दिल्लीत दाखल झाल्याची बातमी प्रसार माध्यमांमधून फिरत होती. त्यामुळे, पंतप्रधान मोदींच्या २०२१ च्या मंत्री मंडळाच्या फेरबदल आणि विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना देखील महत्वाचं स्थान आणि पद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
मात्र, आज पंकजा मुंडे यांनी ट्विट करून, या प्रकारच्या सर्व बातम्यांचे खंडण केले आहे. “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत,” असं त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Read Also :
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- “या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”
- “काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!