मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनात, पहिल्या दिवशी ओबीसी आऱक्षणाचा ठराव मंजूर करताना, भाजप आमदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातला, घोषणाबाजी केली, अध्यक्षांच्या समोरील माईक ओढला. तसेच, याहीपुढे जाऊन, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
“या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”
यामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. हे कमी होते काय, म्हणून दुसऱ्या दिवशी भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून विधानसभेबाहेर सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत, प्रतिविधानसभा भरवण्यात आली. तसेच, कामकाजात अडथळा आणण्यासाठी आमदार रवी राणा यांनी तर थेट राजदंडच पळवला.
‘मी पुन्हा येईन’साठी
किती रडीचा डाव खेळणार?
सभागृहात न जाता बाहेर शो बाजी
करुन काय मिळविणार?#MansoonSession— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 6, 2021
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
दरम्यान या दोन दिवसांत एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीनंतर, भाजपवर अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी घातलेल्या राड्यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत हल्लबोल केला असून, “मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करुन काय मिळविणार?” अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
Read Also :
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- “काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!
- जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
- “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”