नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. जवळपास २० ते २५ जणांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांची पंख छाटण्यात येणार आहे. राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून राज्यातून रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. दरम्यान, रावसाहेब दानवेंसह सुमारे १० जणांनी राजीनामे देण्यात आले आहेत.
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांची विस्तारापूर्वी मोदी मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात आली आहे. या सर्वांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे.
“या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”
आज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ४३ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहे, ही संख्या वाढून ८१ होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना डच्चू मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून चार नेत्यांचा नव्या विस्तारात समावेश करण्यात येणार असल्याने दानवेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाण्याचं वृत्त आहे.
मोदींच्या निवासस्थानी बैठक हे नेते उपस्थित
सर्वानंद सोनोवाल
ज्योतिरादित्य सिंधिया
अनुप्रिया पटेल
पशुपती पारस
मीनाक्षी लेखी
अजय भट्ट
शोभा करदंलाजे
नारायण राणे
भागवत कराड
हिना गावित
अजय मिश्र
आरसीपी सिंह
भूपेंद्र यादव
कपिल पाटिल
बीएल वर्मा
अश्ववनी वैष्णव (ओडिशा)
शांतनु ठाकूर(बंगाल)
Read Also :
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
- ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- “या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”