मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत. यातच आता उद्या दोन्ही गटाची बैठक पार पडणार आहे. त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…राज्यातील बंडानंतर आता निवडणुकांचे वेध, ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुकांचा हंगाम सुरू
यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घरामे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. आमदार इंद्रनील नाईक हे देखील अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. पुसदमध्ये आयोजित सहविचार सभेत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये नाईक परिवाराचे मोठे महत्व आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नाईक परिवार पक्षामध्ये आहेत. त्यामुळे याचा मोठा धक्का शरद पवारांना बसला आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “
दरम्यान, उद्या मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी आता कोण कोण उपस्थित राहणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर अजित पवार गटाकडून लोकांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांची नोशनलिस्ट पार्टी आहे. त्यामुळे मला निलंबित करण्याचा अधिकार फक्त शरद पवारांकडे असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांकडे अर्थमंत्री पद ? शिंदे गटात मोठी अस्वस्थता , राजकीय करीअर धोक्यात, आमदारांची भावना?
हेही वाचा…पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मॅरेथान बैठक, अजित पवार की शरद पवार, पाठिंबा कुणाला ?
हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता ‘अजित पवार’ यांच्या सोबत जाणार नाही
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं,पण..”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गौप्यस्फोट
हेही वाचा…अजित पवारांकडे ‘महसुल खातं’ तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कोणती खाती ? खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर