मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप अन् शिंदेंच्या आमदारांमध्ये मोठी गोची झाली आहे. अजित पवारांना सत्तेत सामावून घेतल्याने भाजपचे अनेक नेते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यातच इंदापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”
अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे हर्षवर्धन पाटलांची पंचाईत झाल्याची चर्चा सध्या होत आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. जिल्हा बॅंक आणि जिल्ह्यातील सहकारात हे दोन्ही नेते कायमच एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. पण आता अजित पवार भाजपसोबत आल्याने हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी डॉ. कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
दरम्यान, अजित पवार यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शिंदेंनी अजित पवार यांना अर्थमंत्री पद देऊ नये म्हणून शिंदे गटातील आमदारांनी शिंदेंची भेट घेतली आहे. यातच आज अजित पवार यांच्या उपस्थिती कॅबिनेट बैठक होत आहे. यातच आज खातेवाटपाबाबत निर्णय घेतला जाणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांची साथ सोडून ‘चार’ आमदार पवारांकडे पुन्हा परतले, शरद पवारांची मोठी रणनीती
हेही वाचा…शरद पवारांना अध्यक्ष मानता मग पटेल अन् तटकरेंची हाकालपट्टी मान्य आहे का ? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल