मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. आज अजित पवार गटाकडून काही नेत्यांच्या पक्षात नवीन नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का ? त्या संदर्भात काल निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल साहेब बोलले. मी सुद्धा १९९ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरूवात केली. आजपर्यंतच काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. असंही अजित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा
तर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांची पक्षातून हाकालपट्टी करणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो. आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का ? असा सवाल देखील केला आहे.
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
यातच आज अजित पवार यांच्या गटाकडून विविध नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विधीमंडळ गटनेते म्हणून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, तर राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण, आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रूपाली चाकणकर यांची नेमणुक करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं