मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होत सर्वाना धक्का दिला. पवार याच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना धक्का देत बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे. माजी आमदार आणि ठाकरेंचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी
१९९१ साली भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्या विरोधात शिशिर शिंदे यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदून टाकली होती. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते बाबासाहेब ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदल्यानंतर त्यात इंजिन ऑइलही टाकण्यात आले. त्यामुळे खेळपट्टी खराब झाली आणि अखेरीस मालिका रद्द करावी लागली.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना
शिशिर शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते 2009 मध्ये उपनगर भांडुपमधून आमदार म्हणून निवडून आले होते. 2018 मध्ये ते पुन्हा शिवसेनेत परतले. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र आळीत शिवसेनेच्या (यूबीटी) उपनेतेपदी नियुक्ती होऊनही त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. गेल्या सहा महिन्यांत ठाकरे यांची भेट घेणे अशक्य झाल्याचे म्हंटले होते. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?