मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. काल राजभवनात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार, खासदार पदाधिकारी या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांकडून राष्ट्रवादीतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्याचं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. यातच आता शरद पवार यांनी मैदानात उतरून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचं सांगितल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवारांकडे परतू लागले आहेत. खासदार अमोल कोल्हे देखील काल राजभवनात होते. परंतु मी साहेबांसोबत असं म्हणून ते पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत.
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी श्री. शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे… pic.twitter.com/8o0ZNbEao8
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?